पोलिस पाटील पदांच्या एकुण 344 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

POLICE PATIL : पोलिस पाटील पदांच्या एकुण 344 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon District Police Patil Post Megabharati , Apply Now ) पदनाम , पदाची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जळगाव जिल्हातील 7 उपविभाग ( तालुका ) मधील रिक्त पोलिस पाटील पदांच्या एकुण 344 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उपविभागांनुसार रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

उपविभागानुसार पदसंख्या : यांमध्ये जळगाव जिल्हातील फैजपुर उपविभागांमध्ये पोलिस पाटील पदांच्या एकुण 43 जागा , अमळनेर उपविभागांमध्ये 80 जागा , भुसावळ मध्ये 36 जागा , एरंडोल मध्ये 66 जागा , पाचोरा मध्ये 36 जागा , चाळीसगाव मध्ये 41 जागा तर जळगाव उपविभागांमध्ये 42 अशा एकुण 344 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग मार्फत गट ब व क संवर्गातील तब्बल 1876 जागांसाठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

पात्रता : सदर पोलिस पाटील या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवार हे स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहेत .त्याचबरोबर उमेदवाराचे वय दिनांक 18 जुलै 2023 रोजी किमान वय 25 वर्षे तर कमाल वय 45 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://police.ppbharti.in/Home/Index या संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पोलिस पाटील या पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 600/- रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment