मुली / महीलांना या क्षेत्रामध्ये करीअर करण्याची मोठी संधी .

Spread the love

आजकाल सहज नोकरी मिळणे शक्य नाहीत .यामुळे सुशिक्षित तरुण वाईट मार्गावर लागले आहेत . उच्च शिक्षण घेवूनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नसल्याने तरुणांमध्ये मोठे नैराश्य निर्माण होत आहे .यामध्ये मुलींना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो .परंतु आजच्या काळामध्ये योग्य शिक्षण घेतल्यास सहज व चांगल्या पगाराचा जॉब सहज मिळु शकतो . यासाठी नेमके कोणकोणते क्षेत्र आहेत ते पाहुयात .

  1. मेडिकल क्षेत्र – मुलींच्या बाबतीत मेडिकल क्षेत्रामध्ये ,उत्तम करीअर करण्याची संधी आहे .यासाठी 10 वी व 12 वी नंतर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत .जसे कि , डी.फार्मसी ,डी.एम.एल.टी ,नर्सिंग ,डायलिसिस कोर्स ,टेक्निशियन कोर्स ,मिडवायफरी कोर्स इत्यादी कोर्सेस केल्यांनतर मेडिकल क्षेत्रामध्ये चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळते .
  2. आयटीआय मधील कोर्सस – आयटीआय मध्ये अनेक व्यवसायभिमुख कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .यामध्ये मुलींना / महिलांना रोजगार मिळेल या उद्देशांने अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत .जसे कि ,फॅशन डिझायनिंग , शिवनकाम , इलेक्ट्रिशियन कोर्से , कोपा इत्यादी . कोर्सेस केल्यानंतर मुलींना सहज व चांगल्या पगाराचा जॉब मिळू शकेल .
  3. उच्च शिक्षण – उच्च शिक्षणामध्ये एम.बी.ए , एम.बी.बी.एस , बी.ई ,बी.बी.ए , तसेच अकांटींग मध्ये पीजीडीबीओ कोर्स केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी सहज मिळू शकेल .
  4. त्याचबरोबर आजच्या युगात फिटनेसच्या बाबतीत महिला वर्गामध्ये जास्त आकर्षण वाटु लागले आहेत . यामुळे महिला वर्गामध्ये जिम करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत . यामुळे जिम ट्रेनर म्हणुन जॉब करण्याची मोठी संधी उपलब्ध होत आहेत .
  5. ब्युटी पार्लर – महिलांना सौंदार्याचे मोठे आकर्षण असल्याने ब्यूटी पार्लर मध्ये करिअर करण्याची मोठी संधी आहे . यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत .कोर्स पुर्ण झाल्यानंतर वैयक्तिक व्यवसाय देखिल करु शकता .

Leave a Comment