MH PWD : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 2,109 जागांसाठी मेगाभरती !

Spread the love

MAHA PWD : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 2,109 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Work Department ( PWD ) , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2,109 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) पदांच्या 532 जागा , कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) पदांच्या 55 जागा , कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पदांच्या 05 जागाा , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या 1378 जागा , लघुलेखक ( उच्च श्रेणी ) पदांच्या 08 जागा , लघुलेखक ( निम्न श्रेणी ) पदांच्या 02 जागा , उद्यान पर्यवेक्षक पदांच्या 12 जागा , सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ पदांच्या 09 जागा ,

स्वच्छता निरीक्षक पदांच्या 01 जागा , वरिष्ठ लिपिक पदांच्या 27 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 05 जागा , वाहन चालक ( Driver ) पदांच्या 02 जागा , स्वच्छक ( Clener ) पदांच्या 32 जागा तर शिपाई पदांच्या 41 जागा अशा एकुण 2109 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता करीता अभियांत्रिकी पदवी / 10 वी / 12 वी / मराठी 30 श.प्र.मि टायपिंग , 40 श.प्र.मि इंग्रजी विषयातील टायपिंग पात्रता / लघुलेख 120 श.प्र.मि , लघुलेखन 100 श.प्र. मि / वास्तुशास्त्र पदवी / स्वच्दता निरीक्षक प्रमाणपत्र / वाहन चालविण्याचा परवाना / कोणतीही पदवी / 7 वी उत्तीर्ण ..

वयोमर्यादा : सदर वरील सर्व पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 06 नाव्हेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग / अनाथ / दिव्यांग तसेच आदुघ मधील उमेदवारांना वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment