महाराष्ट्र राज्यांमध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनिस त्याचबरोबर मिनी अंगणवाडी सेविका पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या संदर्भात राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडुन सदर पदभरती विषयी सविस्तर माहीती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . अंगणवाडी कर्मचारी पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर पदभरती माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा , मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक त्याचबरोबर राज्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये , बैठक संपन्न झाली .
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यात 20,186 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदभरती करणे बाबत मोठा निर्णय घेतला आहे . शिवाय सदर पदभरती प्रक्रिया ही 6 महिन्याच्या आत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली .त्याचबरोबर यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीवर देखिल सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे . तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नविन मोबाईल देण्याचा देखिल सकारात्मक चर्चा करण्यात आली .
पात्रता – अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये अंगणवाडी शिक्षिका , अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनिस हे पद मंजुर आहेत . यामध्ये अंगणवाडी शिक्षिका हे पद खुप कमी प्रमाणात मंजुर आहेत . अंगणवाडी शिक्षिका ,अंगणवाडी सेविका पदांकरीता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर अंगणवाडी मदतनसि पदांकरीता 4 थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
या संदर्भातील अधिकृत्त पदभरती प्रक्रिया बाबतची माहीती राज्य शासनाच्या अधिकृत्त संकेतस्थळ महासंवाद वर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे .
- फिजिक्स वाला महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- समर्थ पॉलिटेक्निक नगर अंतर्गत HOD , लेक्चरर , वर्कशॉप अधिक्षक , अकाउंटंट , प्रयोगशाळा सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- वन विभाग अंतर्गत शिपाई ( MTS ) , लिपिक ,सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन , पुणे अंतर्गत केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती ; Apply Now !
- आदिवासी विकास विभाग अमरावती , नाशिक , ठाणे , नागपुर अंतर्गत विविध गट ब & क संवर्गातील तब्बल 614 जागेसाठी महाभरती !