भारत सरकारकडून देशातील जेष्ठ नागरिकांना PM वय वंदन योजना सुरू केली आहे.या योजनेत गुंतवणूक केल्यास म्हातारपणात पेन्शन मिळण्याची संधी आहे.देशातील जेष्ठ नागरिकांसाठी सरकार नवीन नवीन योजना राबवित असतात. सरकारकडून जेष्ठ नागरिकांसाठी नवीन पेन्शन योजना लागु करण्यात आली आहे. 60 वर्षाच्या जेष्ठ नागरिकांसाठी सरकारने ही योजना राबविली आहे.
60 वर्षाच्या वर असणारे जेष्ठ नागरिकच या योजनेचा फायदा घेऊ शकतात. प्रधानमंत्री वय वंदन योजना सरकारने राबविली आहे. 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेत काही गुंतवणूक करावी लागते,तरच या योजनेचा फायदा होतो.जेष्ठ नागरिकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पद्धतीने पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये जेष्ठ नागरिकांना घरबसल्या उतरत्या वयात पेन्शन मिळते.
योजना:
सरकारी लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, 60 वर्षापेक्षा कोणताही भारतीय नागरिक PM वय वंदन योजना या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पात्र आहे. त्यांना दर महिन्याला निवृत्ती वेतनाची हमी मिळेल. इतकेच नाही तर तुमची गुंतवलेली मूळ रक्कम या योजनेत सुरक्षित राहते, तर नागरिकांना ती रक्कम काही अंतराने परत दिली जाते.
तुमच्या गुंतवणूकीच्या तारखेपासून 10 वर्षानंतर तुमचे पैसे सुद्धा परत मिळते. या योजनेत पति पत्नीने एकत्र गुंतवणूक केल्यास दर महिन्याला 18,500 रुपये पेन्शन मिळू शकते.जेष्ठ नागरिकांनी या योजनेनुसार 15 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करणे आवश्यक आहे,जे रक्कम एका वर्षानंतर परत केली जाईल,तर लाभाची रक्कम तुम्हाला दर महिन्याला किंवा तुम्ही निवडलेल्या विशिष्ट अंतराने दिली जाईल. इच्छुक असलेले लोक 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकता.
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !