महाराष्ट्र वनविभाग : पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर येथे 10 वी ते पदवी धारकांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र वनविभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर येथे इयत्ता 10 वी ते पदवी धारक उमेदवारांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Forest Department Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जीवशास्त्रज्ञ01
02.पशुवैद्यकीय अधिकारी01
03.निसर्ग पर्यटन व्यवस्थापक02
04.सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक02
05.उपजिविका तज्ञ02
06.सर्वेक्षण सहाय्यक01
07.GIS तज्ञ01
08.ग्राफिक डिझायनर01
09.सिव्हिल इंजिनिअर01
10.बचाव मदत टीम04
 एकुण पदसंख्या16

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : जीवशास्त्रज्ञ या पदाकरीता उमेदवार हे वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र /वानिकी / पर्यावरण शास्त्र / वनस्पतीशास्त्र या विषयांमध्ये किमान 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर अर्हता उत्तीर्ण तसेच पीएचडी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.02 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठामधून उमेदवार हे 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी , वन्यजीव विषयामध्ये पदवी असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल .

पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटी / पर्यटन व्यवस्थापन यांमध्ये पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : MIDC : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण / हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटी / पर्यटन व्यवस्थापन यांमध्ये पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.05 साठी : MSW / कृषी व्यवस्थापनांमध्ये एमबीए तसेच किमान 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .

पद क्र.06 साठी : पदवी तसेच टंकलेखन इंग्रजी 40 श.प्र.मि वेग , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि वेग व किमान 03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.07 साठी : विज्ञानांतील पदवी किंवा बी.ए भूगोल विषयांस उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच किमान 03 वर्षांचा अनुभव आवश्यक ..

पद क्र.08 साठी : कोणतीही पदवी , ग्राफिक डिझायनिंग मध्ये पदवी किंवा पदविका अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.09 साठी : इंजिनिअरिंग पदवी व सदर क्षेत्रांमध्ये किमान 03 वर्षे काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.10 साठी : किमान दहावी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच एमएससीआयटी उत्तीर्ण त्याचबरोबर वन्यप्राणी बचाव / रेस्क्यु कार्य मोहिम अनुभव प्रमाणपत्र आवश्यक ..

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 05 ऑगस्ट 2023 अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment