महाराष्ट्र राज्यातील वन विभागांमध्ये संवर्ग ब अराजपत्रित , गट क व गड ड या संवर्गातील पदभरती प्रकिया बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख यांच्या कडून पदभरती प्रक्रिया बाबत सुधारित जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यानुसार वनविभागातील रिक्त पदांवर पदभरती करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
राज्यातील सर्व मुख्य वनसंरक्षक यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी पत्र सादर करुन सुधारित बिंदुनामावली तयार करण्याचे निर्देश यापुर्वीच देण्यात आलेले होते .यानुसार वनविभागाकडून सुधारित बिंदुनामावली तयार करण्यात आलेली असून पदांनुसार सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आलेला आहे .सदर सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त व अतिरिक्त मंजुर पदांवर पदभरती करणेबाबत आदेश देण्यात आलेले आहेत .
गट क संवर्गामध्ये लॉच चालक , ट्रक चालक , गृहप्रमुख , ग्रंथालय परिचर , पशु परिचर यांचा समावेश आहे . तर संवर्ग ड मध्ये सहाय्यक स्वयंपाकी , चनमॅन , नॉका तांडेल , खलाशी , शिपाई , पहारेकरी इत्यादी पदे राज्य शासनांच्या शासन पत्र 31 जानेवारी 2023 मधील सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
त्याचबरोबर वनरक्षकांची अनूसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनूसचित क्षेत्र अशी वर्गवारी करुन पदभरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील वनविभाग महाभरतीची सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !