महाराष्ट्र वनविभाग मेगाभरती : अखेर महाराष्ट्र वन विभागांमध्ये वनरक्षक पदांच्या 9640 जागांसाठी मेगाभरर्ती जाहीर ! पात्रता फक्त 12 वी उत्तीर्ण !

Spread the love

नागपुर : महाराष्ट्र वनविभागांमध्ये वनरक्षक पदांच्या रिक्त जागांपैकी 9640 जागांसाठी मेगाभरती होणार आहे . याकरीता वनविभागाकडुन अधिसुचना जारी करण्यात आली असून सदर भरती वनविभागातील संवर्ग क मधील वनरक्षक पदांकरीता राबविण्यात येणार आहे .सदर पदभरती प्रक्रिया बाबतीची सविस्तर अधिसुचना पुढीलप्रमाणे विशद करण्यात आली आहे .

वनरक्षक पदांकरीता आवश्यक पात्रता ( Forest Guard ) –

वनरक्षक पदांकरीता उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार , माजी सैनिक , नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले / गंभीर जखमी झालेले वनखबरे , वन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना सदर पदभरती प्रक्रिया मध्ये विशेष आरक्षण देण्यात येईल . तसेच वनरक्षक पदाकरीता उमेदवार हा शारिरीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे .

वेतनश्रेणी –सातव्या वेतन आयोगानुसार वनरक्षक पदाकरीता 19500-62000/- रुपये + इतर लागु असणारे भत्ते

निवड प्रक्रिया –

वनरक्षक पदांकरीता सर्वप्रथम उमेदवाराची शारीरीक चाचणी घेण्यात येईल , शारिरीक चाचणीमध्ये 5 कि.मी धावण्याची चाचणी घेण्यात येईल . शारिरीक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येईल . लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर , शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा यांचे एकत्रित गुण एकत्र करुन उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अधिक माहीतीसाठी वनविभागाची नोटीफिकेशन डाऊनलोड करा .

भरती नोटिफिकेशन

Leave a Comment