महाराष्ट्र राज्यातील शासकीय / जिल्हा परिषद तसेच इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के महागाई भत्ताचा लाभ लवकरच मिळणार आहे . सदर डी.ए वाढीबाबतचा निर्णय अधिवेशनांमध्ये घेणे अपेक्षित होते , परंतु राज्य शासनाकडुन अधिवेशनांमध्ये डी.ए वाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याने डी.ए वाढीसाठी राज्य कर्मचाऱ्यांना आणखीण प्रतिक्षा करावी लागणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना नेहमीच डी.ए वाढीसाठी प्रतिक्षा करावी लागते , केंद्र सरकारने डी.ए वाढ लागु केल्यास त्यानंतर नेहमीच विलंबाने डी.ए मधील वाढ लागु करण्यात येते . शिवाय डी.ए थकबाकीसाठी देखिल प्रतिक्षा करावी लागते . नुकतेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आलेली आहे .
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना देखिल 4 टक्के डी.ए मधील वाढीसाठी प्रतिक्षा लांबणीवर चालली आहे .सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार 34 टक्के दराने डी.ए मिळत आहे , यामध्ये जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ लागु होणार असून , एकुण डी.ए 38 टक्के होईल .
या दिवशी मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ –
डी.ए मधील वाढ तात्काळ लागु करावी असे निवदेन कर्मचारी संघटनांनी राज्य सरकारले दिलेले आहेत . सदर डी.ए वाढ जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे .
- जिल्हा परिषद कोल्हापुर येथे विविध पदांकरीता पदभरती , लगेच करा आवेदन !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये वर्ग 3 व वर्ग 4 ची पदे बाह्यस्त्रोतामार्फत पदभरती GR निर्गमित !
- भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये गट ब आणि क संवर्गातील 3000+ जागांसाठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,104 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , लगेच करा आवेदन !
- India Post : भारतीय डाक विभाग मध्ये 1,899 जागांकरीता महाभरती , लगेच करा आवेदन !