राज्य कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर ! अधिवेशनांमध्ये कर्मचारी हिताचा घेण्यात आलेला अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय !

Spread the love

महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले असून , अधिवेशनांमध्ये कर्मचारी हिताचा एक अत्यंत मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे .राज्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये सध्या जवळपास 63 हजार पेक्षा अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत .

अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी गेल्या महिन्यामध्ये शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी वाढीव आगाऊ अनुदानाची घोषणा केलेली होती . त्याच अनुषंगाने राज्यतील 63 हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनाकरीता अनुदान प्राप्त करुन देण्यात येणार आहेत .त्याचबरोबर 20 टक्के अनुदानासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पात्र ठरविण्यात येणार आहेत .सध्या पाठपुराव्यानुसार , नाशिक जिल्ह्यातील 1101 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी 20 टक्के अनुदानास पात्र ठरविण्यात आलेले आहेत .

या अगोदर जे कर्मचारी 20 टक्के अनुदावर कार्यरत होते अशांना 40 टक्के , तसेच जे कर्मचारी 40 टक्के अनुदावर कार्यरत होते अशांना 60 टक्के तर जे 60 टक्के अनुदानाव कार्यरत होते अशांना 100 टक्के अनुदानावर कार्यरत करण्याकरीता राज्य शासनाकडुन 1660 कोटींची तरतुद करण्यात आलेली आहे .या निर्णयामुळे राज्यातील अनुदानित / विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे .

Leave a Comment