MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 765 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये विविध विषयातील प्राध्यापक तसेच महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट ब पदांच्या तब्बल 765 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.एस / एम .डी / एम.बी.बी.एस / डी.एन बी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय 19 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 01 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 719/-रुपये तर मागास प्रवर्ग / आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग / दिव्यांग / अनाथ प्रवर्ग करीता 449/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment