“जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” ह्या गीताला आता महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Jai Jai Maharashtra Majha : “जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताचे स्वर कानावर पडतात मराठी माणसाच्या अंगावर शहारे व रोमांच उभा राहतात व मराठी नागरिकांचे उर अभिमानाने गर्वाने भरून येते. मित्रांनो याच गरजा महाराष्ट्र या गीताला राज्य गीताचा दर्जा मिळालेला असून आता जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्याचे राज्य गीत म्हणून घोषित केले आहे.
मागे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय मांडला आणि या निर्णयाला मंजुरी देखील मिळाली. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याने राज्य गीत म्हणून स्वीकार करावा. असा ठराव बैठकीत मंजूर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून 19 फेब्रुवारी पासून हे गीत आता अंगीकारण्यात येईल.
जय जय महाराष्ट्र माझा या गीताला महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचा दर्जा दिला जाईल. अशी घोषणा मागील काही दिवसांपूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. शेवटी आता या घोषणेवर प्रत्यक्षपणे अंमलबजावणी होईल आणि या गीताला राज्य की त्याचा दर्जा पूर्णपणे दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक राज्याचे एक वेगळे राज्य गीत असावे असा ठराव थेट केंद्रीय पातळीवर घेतला. या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तीन गीतांची राज्य गीत म्हणून निवड केली होती. त्यापैकी गरजा महाराष्ट्र ह्या गीताला प्राधान्य देऊन राज्य गीत म्हणून स्वीकारले. अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
या गाण्यामधील दोन कडवी घेतली जाणार असून हे गीत आता एका मिनिटाचे किंवा दीड मिनिटाचे करण्यात येणार आहे व अशाप्रकारे हे गीत पुढे सादर केले जाईल. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते. या जयंतीनिमित्त औचित्य साधून हे गीत राज्य गीत म्हणून सादर केले जाईल. सर्व शासकीय व मोठ्या कार्यक्रमांमध्ये ही हे गीत लावण्यात येईल. या गीतामुळे संपूर्ण महाराष्ट्राला नवीन ऊर्जा मिळते उत्साह मिळतो असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या नागरिकांसमोर असतो व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे गौरव गीत म्हणजेच जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताची ओळख होईल. सीमा आंदोलनाच्या कालखंडामध्ये या गीताला चांगलाच प्रतिसाद व लोकप्रियता मिळाली. महाराष्ट्र मुक्तीच्या संग्रामामध्ये हे गीत सर्व नागरिकांसाठी एक प्रेरणादायी गीत म्हणून ठरले. या गीताचे लेखक कवी राजा बढे हे असून या गीताचे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी या गीताचे स्वरबद्ध अशी रचना केली. शाहीर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजामध्ये हे गीत आजरा मर केले.
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .