महाराष्ट्र स्थावर संपदा न्यायाधिकरण मध्ये लिपिक, सहाय्यक, शिपाई, इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उच्च श्रेणी लघुलेखक02
02.लघुटंकलेखक01
03.अधिक्षक02
04.सहायक अधिक्षक02
05.वरिष्ठ लिपिक09
06.अभिलेखापाल01
07.तांत्रिक सहायक01
08.कनिष्ठ लिपिक04
09.लिपिक02
10.शिपाई13
 एकुण पदांची संख्या37

आवश्यक शैक्षणिक अर्हत ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे पदवी / विधी पदवी / विज्ञान शाखेतील पदवी / दहावी / बारावी / मराठी भाषेचे ज्ञान / एमएससीआयटी प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .. ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा . )

हे पण वाचा : महाराष्ट्र शिक्षण सोसायटी पुणे , येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण , पहिला मजला , वन फोर्ब्स इमारत डॉ.वि.बी गांधी रोड काला घोडा , फोर्ट , मुंबई 400001 या पत्यावर दिनांक 26 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment