महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण , मुंबई कार्यालयातील पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने साक्षांकित प्रतीसह विहीत नमुन्यात मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

1.वरिष्ठ लिपिक : वरिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 08 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच अनुभव असणाऱ्यांस प्राधान्य देण्यात येईल . सदर पदांकरीता प्रतिमहा 34,760/- रुपये प्रतिमहा वेतन देण्यात येईल .

2.लेखापाल : लेखापाल पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेतुन पदवी उत्तीर्ण तसेच Tally Course उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तसेच अनुभवी उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल .सदर पदांस प्रतिमहा 57,800/- रुपये इतके वेतनमान देण्यात येईल .

3.माहिती तंत्रज्ञान अधिकारी :  माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान / संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी तसेच अनुभवी उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल .सदर पदांकरीता प्रतिमहा 40,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

हे पण वाचा : भांडारपाल , चालक ,ऑपरेटर ,वेल्डर ,लास्कर ,शिपाई ,सफाईगार ,कामगार इ.पदांसाठी पर्मनंट पदभरती , लगेच करा आवेदन !

4.तांत्रिक सहायक : तांत्रिक सहायक पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञा शाखेतील संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांकरीता प्रतिमहा 35,000/- वेतनमान देण्यात येईल .

5.कनिष्ठ लिपिक : कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 07 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी तसेच मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ,तसेच MSCIT प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक .सदर पदांकरीता प्रतिमहा 32,800/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

हे पण वाचा : राज्यात मुंबई येथे विवीध पदांसाठी मोठी पदभरती .

6.शिपाई : शिपाई पदांच्या एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच सदर पदांकरीता निवड झालेल्यांना प्रतिमहा 25,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलिय न्यायाधिकरण मुंबई 400001 या पत्त्यावर दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment