महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकांमध्ये 22,381 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राज्य शासनाकडून लवकरच मार्गी लागणार आहे . या पालिका महाभरतीमुळे राज्यातील तब्बल 22,381 बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र राज्यातील 28 महानगरपालिका मध्ये तब्बल 22,381 पदे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्यात भरण्यात येणार आहेत .यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकांध्ये सर्वाधिक रिक्त पदे 10 हजार आहेत यापैकी 950 जागेवर पदभरती सुरु करण्यात आलेली आहे , त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये 9,900 पदे रिक्त आहेत .तसेच पुणे महानगरपालिका मध्ये 9 हजार पदे रिक्त आहेत ,यापैकी राज्य शासनाच्या सुचनेनुसार 40 टक्के पदे भरण्यात येणार आहेत .
तसेच परभरणी महापालिकेमध्ये 81 , अहमदनगर पालिकेत 184 , अकोला 249, मालेगाव 614 ,सोलापुर 340 , पनवेल 412 , नाशिक 630 , जळगाव 200 , अमरावती 485 ,धुळे 260 , नांदेळ वाघाळा 210 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
वरील पदे हे कायमस्वरुपी आस्थापनेवर भरण्यात येणार असून , उर्वरित रिक्त पदांवर कंत्राटी / रोजंदारी पद्धतीने पदभरती प्रक्रिया करण्यात येणार आहे . यामध्ये प्रामुख्याने अधिक जबाबदारीचे पदे कनिष्ठ लिपिक , शिक्षक , शिपाई , सुरक्षा रक्षक , सफाई कर्मचारी या पदांची पदभरती करण्यात येणार आहे .
सदर महाभरती प्रक्रिया मुळे राज्यातील तब्बल 22,381 तरुणांना राज्य सेवेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे . याबाबतची मेगाभर्ती प्रक्रिया 15 मार्च 2023 पर्यंत जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असून , परीक्षेचे आयोजन मार्च महीन्यांच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !