सहकार पणन व उद्योग विभागामध्ये गट अ, ब व क संवर्गातील विविध पदांसाठी मोठी महाभरती !

Spread the love

सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग मध्ये वर्ग -1 , वर्ग – 2 व वर्ग – 3 पदांच्या पदभरती संदर्भात जाहिरात दिनांक 06 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . विभागानुसार रिक्त पदांची संख्या , वेतनश्रेणी त्याचबरोबर सविस्तर पदभरती संदर्भात जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात..

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रशासन मुंबई / कोकण/ नाशिक /पुणे /कोल्हापूर /औरंगाबाद /लातूर/ अमरावती/ नागपूर या कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी 1,सहकारी अधिकारी श्रेणी 2, सहाय्यक सहकारी, अधिकारी /वरिष्ठ लिपिक उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व टंकलेखक आणि विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था लेखापरीक्षण नाशिक विभाग नाशिक या कार्यालयाचे आस्थापनेवरील लेखापरीक्षक श्रेणी 2 ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे..

पदनाम : यामध्ये प्रामुख्याने सहकारी अधिकारी श्रेणी 1, सहकारी अधिकारी श्रेणी 2, लेखापरीक्षक श्रेणी 2, सहाय्यक सहकारी अधिकारी /वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, टंकलेखक अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

निवड प्रक्रिया : वरील सर्व पदांसाठी संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे .संगणक आधारित घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे . उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक व टंकलेखक या पदांसाठी परीक्षेमध्ये किमान 45 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे .

पदानुसार वेतनश्रेणी :

माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment