राज्यात सर्वात मोठी महाभरती : शिक्षक भरतीच्या तब्बल 33 हजार जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात !

Spread the love

राज्यांमध्ये बऱ्याच वर्षांपासून शिक्षक पदभरती निघाली नव्हती परंतु आता राज्य शासनांने शिक्षक पदांच्या तब्बल 33 हजार जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . या करीता ऑनलाईन पद्धतीने आवेदन करण्यास दिनांक 01 सप्टेंबर 2023 पासून सुरुवात झालेली आहे . सदरची पदभरती ही तब्बल पाच वर्षानंतर होत असल्याने रिक्त पदांचा आकडा हा खुप मोठा आहे .

पदांचे नावे – पवित्र पोर्टल अंतर्गत राज्यातील प्राथमिक / उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याने सदर शाळांमधील प्राथमिक शिक्षक , पदविधर प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , मुख्याध्यापक ( पदोन्नती ) अशा पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

पात्रता : शिक्षक पदांसाठी आवश्यक डी.एड / बी.एड पदविका / पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच शिक्षक पात्रता परीक्षा ( टेट / सीटीईटी / सीईटी ) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

सध्या राज्यातील शासकीय शाळांचा विचार केला असता यांमध्ये जिल्हा परिषदा , नगरपरिषदा / महानगरपालिका तसेच शासकीय शाळांमध्ये रिक्त पदांचा आकडा हा 23,000 इतका आहे . तर खाजगी अनुदानित शाळांचा विचार केला असता शिक्षक पदांच्या तब्बल 8 ते 10 हजार रिक्त पदे आहेत . केवळ जिल्हा परिषदांमधील शाळांचा विचार केला असता जिल्हा परिषदांमध्ये रिक्त शिक्षक पदांचा आकडा हा 12 हजार इतका आहे .असे एकुण मिळून 33 हजार जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : ICG : भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या तब्बल 396 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

शिक्षकांच्या रिक्त जागेवर कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत होती , परंतु अशा पद्धतीच्या नियुक्तीला शिक्षक संघटनांनी तसेच बेरोजगार तरुणांकडून विरोध दर्शविल्याने शिक्षण सारथी ही योजना बंद करण्यात आली आहे . तर सदर रिक्त जागी कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती करण्यात येत आहे .

असा करा आवेदन : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/l  या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत . सदर पवित्र पोर्टल मध्ये रिक्त शाळांवर आपला विकल्प सादर करायचा आहे .

Leave a Comment