आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 602 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tribal Devlopment Department Maharashtra Shasan Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 602 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये उच्चश्रेणी लघुलेखक पदांच्या 3 जागा , निन्मश्रेणी लघुलेखक पदांच्या 13 जागा , वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक पदांच्या 14 जागा , संशोधन सहाय्यक पदांच्या 17 जागा , उपलेखापाल / मुख्यलिपिक पदांच्या 41 जागा , वरिष्ठ लिपिक / सांख्यिकी सहाय्यक पदांच्या 187 जागा , लघुटंकलेखक पदांच्या 5 जागा , गृहपाल ( पुरुष ) पदांच्या 43 जागा , गृहपाल ( स्त्री ) पदांच्या 25 जागा ..
तर अधिक्षक ( पुरुष ) पदांच्या 26 जागा , अधिक्षक ( स्त्री ) पदांच्या 48 जागा , ग्रंथपाल पदांच्या 38 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 29 जागा , आदिवासी विकास निरीक्षक पदांच्या 8 जागा , सहाय्यक ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , प्राथमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) पदांच्या 27 जागा , तर माध्यमिक शिक्षण सेवक ( मराठी माध्यम ) पदांच्या 15 जागा , उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदांच्या 14 जागा , तर प्राथमिक शिक्षण सेवक ( इंग्रजी माध्यम ) पदांच्या 48 जागा अशा एकुण 602 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदवी / 12 वी / 10 वी / MSW / BSW / D.ed / B.ed /B.lib /M.Lib / वाणिज्य पदवी टायपिंग प्रमाणपत्र , तसेच पदांनुसार इतर अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 23 नोव्हेंबर 2023 दुपारी 15.00 पासून ते दिनांक 13.12.2023 रात्री 23.55 पर्यंत आवेदन सादर करु शकता .
पदांनुसार आवश्यक अर्हता / सविस्तर महाभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..