महाराष्ट्र महसूल विभागांमध्ये तलाठी पदांच्या 4,122 जागांसाठी महाभरती जाहीर ! जिल्हानिहाय रिक्त जागांची जाहीरात प्रसिद्ध !

Spread the love

महाराष्ट्र राज्य महसुल विभागांमध्ये तलाठी पदांच्या एकुण 4,122 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून या संदर्भात राज्य शासनाच्या महसूल व वन विभागांकडुन मंजुर रिक्त जागांची संख्या विभागनिहाय व जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत . सदर पदभरती प्रक्रिया मध्ये काही पदे ही नव्याने निर्गमित करण्यात आलेली आहेत .

राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये एकुण 1012 पदे रिक्त आहेत , तर आला तलाठी संवर्गामध्ये नव्याने 3,110 पदे निर्माण करण्यात आलेली आहेत . म्हणजेच आता एकुण 4,122 पदांसाठी तलाठी संवर्गामध्ये जोडण्यात आले असल्याने सदर पदांना रिक्त पदे समजुन एकुण 4,122 पदांसाठी पदभरती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहेत .या संदर्भात राज्य शासनाकडुन परिपत्रक जाहीर करण्यात आलेले असून . सदर तलाठी पदाची पदभरती जाहीरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .

तलाठी पदभरती करीता राज्य शासनाकडुन सामाजिक प्रवर्गनिहाय आरक्षण मंजुर करण्यात आलेले आहे . सदर आरक्षण निहाय उमेदवारांना आवश्यक कागतपत्रे विहीत असल्यासच सदर आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे .याकरीता उमेदवारांनी आपले कागदपत्रे अद्यावत करुन घेणे आवश्यक आहे .

पात्रता – तलाठी पदांसाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील लिकंवर क्लिक करा

जाहिरात पाहा

Leave a Comment