महाभरती 2023 : राज्यात 4,997 जागांसाठी तलाठी / मंडळ अधिकारी पदांसाठी नविन जाहीरात निर्गमित ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्यात तब्बल 4,997 जागेवर तलाठी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यापैकी तलाठी पदांच्या एकुण 4479 जागा आहेत तर मंडळ अधिकारी पदांसाठी 518 जागा आहेत .मंडळ अधिकारी पदांवर देखिल सरळसेवा पद्धतीनेच पदभरती करण्यात येणार आहेत . काही पदे ही पदोन्नती भरण्यात येईल .

औरंगाबाद जिल्ह्यात 117 तलाठी तर 19 जागा मंडळ अधिकाऱ्यांची पदे रिक्त जागेवर पदभरती करण्यात येणार आहे . मराठवाडा विभागांमध्ये 602 तलाठी पदांसाठी तर 105 मंडळ अधिकारी पदांसाठी पदभरती करण्यात येणार आहेत .तलाठी पदांच्या एकुण 8574 जागा मंजुर आहेत तर यापैकी 3165 तलाठी पदांच्या जागा रिक्त आहेत .

तर यापैकी 1,028 तलाठी पदे हे स्थायी पदे आहेत .तर मंडळ अधिकारी पदांच्या 518 जागा रिक्त आहेत .यापुर्वी 3,165 रिक्त जागेवरच पदभरती करण्यात येणार होती परंतु राज्यातील महसुली क्षेत्रांमध्ये वाढ केल्याने तलाठी व मंडळ अधिकारी पदांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे .

तलाठी वेतनश्रेणी – तलाठी पदांना सातव्या वेतन आयोगानुसार 25,500-81,100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन मिळते .तर मंडळ अधिकारी या पदांना सातव्या वेतन आयोगानुसार 32,000-101,600/- या वेतनश्रेंणीमध्ये वेतन मिळते .व इतर लागु असणारे वेतन + भत्ते लागु असतात .

पात्रता – तलाठी पदासाठी उमदेवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संगणक हाताळणी प्रमाणपत्र MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . मंडळ अधिकारी पदांसाठी देखिल उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment