महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभाग मध्ये विविध पदांच्या 8,760 जागेसाठी मेगाभर्ती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज प्रक्रिया लवकरच ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत .भरती प्रक्रिया संदर्भात आदिवासी विकास विभागाकडुन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे .सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
आदिवासी विकास विभागाच्या सुधारित आकृत्तीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे . वित्त विभागाच्या दि.31.10.202 च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरुन आदिवासी विभागाच्या सुधारित आकृत्तीबंधानुसार गट क व गट ड संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदांपैकी रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही दि.30 जुन 2023 अखेर पर्यंत पुर्ण करणे आवश्यक असल्याने या संदर्भात भरती प्रक्रियाचे वेळापत्रक जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहेत .
गट क व गट ड संवर्गातील पद भरतीच्या संदर्भात आयुक्त आदिवासी विकास यांनी परीक्षा प्रकिया राबविण्यासाठी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कंपनी निश्चित करुन यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सध्या आदिवासी विकास विभागांमध्ये विविध पदांच्या सुमारे 8,760 जागा रिक्त आहेत . यामध्ये शिक्षक , कनिष्ठ लिपिक , वर्ग – 2 अधिकारी , विस्तार अधिकारी , वरिष्ठ लिपिक ,भांडारपाल , गृहपाल , अधिक्षक / अधिक्षिका , प्रयोगशाळा सहाय्यक , स्वयंपाकी इत्यादी तर वर्ग – 4 मधील पदे हे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत .
भरती प्रक्रिया संदर्भातील आदिवासी विकास विभागाकडुन निर्गमित झालेले भरती वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .
- GTDC : गोवा पर्यटन विकास महामंडळ मध्ये पदभरती 2023 , लगेच करा आवेदन ! लगेच करा आवेदन !
- MPCB : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- मुख्य महानगर दंडाधिकारी कार्यालय मुंबई येथे विविध पदांच्या 144 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- नमो महारोजगार मेळावा : विविध पदांच्या तब्बल 10,000+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 5,793 जागेवर लघुलेखक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / हमाल पदांकरीता महाभरती !