महाराष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये संवर्ग क मधील तब्बल 18 हजार 939 पदांसाठी मेगाभरती , जिल्हानिहाय रिक्त पदांची आकडेवारी पाहा !

Spread the love

महाराष्ट्र जिल्हा परिषदेमध्ये संवर्ग क मधील सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर मेगाभरती प्रक्रियेच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा निहाय रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे , जिल्हा निहाय जाहीर करण्यात आलेली रिक्त पदांची आकडेवारी पुढीलप्रमाणे पाहुयात .

यानुसार सांगली जिल्हा परिषदेमध्ये एकुण 761 रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविेण्यात येणार आहे . तर कोल्हापुर जिल्हा परिषदेमधील एकुण 633 रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .तर हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये 206 रिक्त पदे आहेत .पुणे जिल्हा परिषदेमध्ये 889 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

हे पण वाचा : संत गाडगेबाबा विद्यापीठ मध्ये विविधता शिक्षकेत्तर पदांसाठी पदभरती !

तर नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सर्वात जास्त पदे रिक्त असून यांमध्ये सुमारे 1800 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पेसा व बिगर पेसा अशी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .तर नागपुर जिल्हा परिषदेमध्ये 561 पदांसाठी पदभरी होणार आहे .तसेच नंदुरबार जिल्हा प्रशासनांकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 488 जागांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

तर यवतमाळ जिल्हा प्रशासनांकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 907 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .वरीलप्रमाणे जिल्हानिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आकडेवारी बाबत जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

अधिक माहीतीसाठी खालील लिंकद्वारे जिल्हानिहाय रिक्त पदांची आकडेवारी पाहा

जिल्हा निहाय रिक्त पदे पाहा

Leave a Comment