महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 14 हजार जागांसाठी महाभरती जाहीर .

Spread the love

महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पालिस शिपाई पदांच्या एकुण 14 हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याचे राज्य शासनाकडुन जाहीर करण्यात आले आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये 14 हजार पोलिस शिपाई जागांकरीता महाभरती प्रकिया राबविण्याची मोठी घोषणा केली आहे .

या सन 2019 मध्ये पोलिस दलामध्ये 7000 पोलिस शिपाई पदांकरीता महाभरती जाहीर करण्यात आली होती . सदर भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांकडुन अर्ज देखिल मागविण्यात आले होती . परंतु कोरोना महामारीमुळे सदर भरती प्रक्रिया पुर्ण झाली नसल्याने , सदर भरती प्रक्रियेमधील 7000 पोलिस शिपाई पदांकरीता भरतीची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केलेली आहे .तर पुढील महीन्यात आणखीन 7000 म्हणजे एकुण 14 हजार जागांकरीता भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे .विधानभवनात एका सदस्यांने पोलिस भरती बाबत प्रश्न उपस्थित केला असता , सदर प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि , सध्या 7000 हजार जागांकरीता पदभरती सुरु असून पुढील महिन्यात आणखीन 7000 जागांकरीता पदभरती राबविण्यात येईल .

याासाठी सर्व आयुक्तालयांकडुन रिक्त पदांचा व बिंदुनामावलीची माहिती मागविली आहे .यामुळे पुढील महिन्यात पोलिस भरती प्रक्रियेस सुरुवात होईल . महाविकास आघाडी सरकारने पोलिस शिपाई भरती मध्ये NCC प्रमाणपत्र खारक उमेदवारांना 5 गुण देण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे .

राज्यामध्ये 14 हजार जागांकरीता मोठी पदभरती राबविली जात असल्याने , राज्यातील बेरोजगार तरुणांना राज्य शासन सेवेत नोकरी करण्याचे स्वप्न अखेर पुर्ण होणार आहे .पोलिस शिपाई पदांच्या भरती चाचणी मध्ये बदल होण्याची मोठी शक्यता वर्तविली जात आहे .याबाबत अधिकृत्त माहिती गृह विभागाकडुन लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे .

2 thoughts on “महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या 14 हजार जागांसाठी महाभरती जाहीर .”

Leave a Comment