RPF : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 52,360 जागांसाठी मेगाभरती .

Spread the love

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पोलिस कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 52360 जागा रिक्त आहेत . शिवाय कोरोना महामारीनंतर रेल्वे मध्ये कोणत्याही प्रकारची पदभरती प्रकिया राबविण्यात आलेली नाही . यामुळे सदर रिक्त पदांवर तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मधील जवान रेल्वे स्टेशन तसेच रेल्वे रुळाला संरक्षण देते . सध्या या फोर्समध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने , रेल्वे स्टेशन स्टेशनवर गुन्हेगारींचे प्रमाण वाढत असल्याने , सदर रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय केंद्रीय रेल विकास मंत्रालयाकडुन घेण्यात आला आहे .

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये एकुण 52360 जागा रिक्त आहेत . तर पुढील एका वर्षामध्ये जवळपास 5000 जवानांची सेवानिवृत्ती होणार असल्याने रिक्त पदांचा आकडा 57000 होणार आहे . यामुळे रेल्वे प्रशानाला RPF जवानांची कमतरता भासु नये याकरीता रिक्त पदांवर तात्काळ भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सदर पदासाठी आवश्यक पात्रता ही 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक राहील . सदर पदाकरीता उमेदवाराची उंची 165 से.मी असणे आवश्यक आहे . तर महिला उमेदवारांकरीता 157 से.मी असणे आवश्यक राहील .तर पुरुष उमेदवारांकरीता किमान वजन 50 KG मागासवर्गीय उमेदवारांकरीता किमान वजनाची अटीमध्ये 02 किलो ग्रॅम सुट देण्यात आली आहे .सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी CLICK HERE

सदर पदांकरीता किमान वय मर्यादा 18 वर्षे तर कमाल 25 वर्षे असणे आवश्यक असणार आहे .सदर पदांकरीता प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल . तर लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची 100 गुणांची शारिरीक चाचणी घेण्यात येणार आहे .यामध्ये गोळा फेक , उंच उडी , 100 मीटर व 5 किलामिटर धावणे , असे प्रकार असणार आहेत .सदर पदांकरीता सातवा वेतन आयोगामध्ये 21710/- वेतन + इतर वेतन व भत्ते मिळते .

अधिक माहितीसाठी सविस्तर जाहीरात पाहा CLICK HERE

Leave a Comment