महाराष्ट्र पोलिस शिपाई पदभरती संदर्भात महत्वपुर्ण सुचना , आवश्यक कागतपत्रे , शारीरिक चाचणी घटक सविस्तर माहिती जाणुन घ्या .

Spread the love

महाराष्ट्र पोलिस शिपाई / पोलिस चालक शिपाई / सशस्त्र पोलिस शिपाई भरती – 2021 करीता उमेदवारांसाठी महत्वपुर्ण सुचना पोलिस प्रशासनांकडुन निर्गमित करण्यात आलेल्या आहेत .पोलिस भरती – 2021 ही महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील विविध घटकांत पोलिस शिपाई / पोलिस शिपाई चालक व राज्य राखीव पोलिस बलातील सशस्त्र पोलिस शिपाई संवर्गात दि.31.12.2021 अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करुन जाहीर करण्यात आलेली आहे . सदरची रिक्त पदे ही सामाजिक आरक्षण अंतर्गत निश्चित करण्यात आली आहेत.

पोलिस प्रशासनांकडुन निर्गमित करण्यात आलेल्या सुचनांमध्ये सेवाप्रवेश नियम तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ त्याचबरोबर निवडीसाठी उमेदवारांची नमूद वय शैक्षणिक व शारिरीक पात्रता बाबत सविस्तर माहिती विषद करण्यात आली आहे .त्याचबरोबर समांतर आरक्षणांतर्गत येणारे उमेदवार यांना देण्यात येणारी वयांमधील सुट नमुद करण्यात आली आहे .

आवश्यक शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम 1965 अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळातून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा ( इयत्ता 12 वी ) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणुन घोषित केलली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

शारीरिक पात्रता –

 पुरुष उमेदवारांकरीतामहिला उमेदवारांकरीता
उंची165 से.मी155 से.मी
छाती79 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहीजे . —–

शारीरिक चाचणी –

पोलिस शिपाई पदांकरीता  – पुरुष व महिला उमेदवारांकरीता –

अ.क्रशारिरीक प्रकारगुण
01.1600 मीटर धावणे ( 800 मीटर महिला उमेदवारांसाठी )20
02.100 मीटर धावणे15
03.गोळाफेक15
 एकुण गुण50

पोलिस चालक शिपाई पदांकरीता – पुरुष / महिला उमेदवारांकरीता

अ.क्रशारिरीक प्रकारगुण
01.1600 मीटर धावणे ( 800 मीटर महिला उमेदवारांसाठी )30
02.गोळाफेक20
 एकुण गुण50

सशस्त्र पोलिस शिपाई पदांकरीता – पुरुष उमेदवारांकरीता

अ.क्रशारिरीक प्रकारगुण
01.5 कि.मी धावणे50
02.100 मीटर धावणे25
03.गोळाफेक25
 एकुण गुण100

लेखी परीक्षेचे स्वरुप –

  1. अंकगणित
  2. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
  3. बद्धीमत्ता चाचणी
  4. मराठी व्याकरण

पोलिस भरती प्रक्रियेबाबत सविस्तर सुचनापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

महत्वपूर्ण सूचना

Leave a Comment