मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ ! नियमित शाळेत जाण्याची आवश्यक नाही . प्रवेश प्रक्रिया सुरु !

Spread the love

महाराष्ट्र राज्यांमध्ये जे विद्यार्थी नियमित महाविद्यालयांमध्ये जावुन शिक्षण घेवू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना यशवंतराव मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी धारण करु शकतात .मुक्त विद्यापीठांमध्ये पदवी / पदविका व इतर कोर्सेस उपलब्ध आहेत .परंतु शालेय अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठांमधुन पुर्ण करता येत नाहीत . मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवरच राज्यांमध्ये , मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे .

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ अंतर्गत जे विद्यार्थी नियमित शाळेत जावू शकत नाहीत , अशा विद्यार्थ्यांना थेट इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश दिला जातो .यासाठी मंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचे आव्हान मंडळाचे प्र.सचिव श्री.माणिक बांगर यांनी केले आहे .मुक्त विद्यालय संकल्पनेतुन शिक्षणांपासुन वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होते .महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.पाचवी व इयत्ता आठवी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि.8.11.2022 ते दि.21.11.2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .

प्रवेश अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज , विहीत शुल्क व मुळ कागतपत्रे दि.10.11.2022 ते दि.25.11.2022 या कालावधी मध्ये अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावयाचा आहे . मुक्त विद्यालयसाठी अर्ज करण्यासाठी – http://msbos.mh-ssc.ac.in या लिंकवर क्लिक करा .

या संदर्भातील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ पुणे यांचे प्रकटन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

प्रकटन PDF

Leave a Comment