महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विविध पदांच्या 78000 जागांसाठी मेगाभरती जाहीर ! विभागानिहाय रिक्त पद पाहा .

Spread the love

महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये मागील तीन वर्षांपासुन कोणतीही पदभरती प्रक्रिया झाली नसल्याने , राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या वाढली आहे .शिवाय कोरोना महामारीमुळे तसेच राज्यातील सत्तांतरामुळे राज्यातील भरती प्रक्रियेला मुहुर्त लागत नव्हता .परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी रिक्त पदांवर व रखडलेल्या पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यातचा मोठा निर्णय घेतला आहे . विभागनिहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहता येईल .

सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये 2.50 लाख पदे रिक्त असले तरी यापैकी काही रिक्त पदांवर कंत्राटी व रोजंदारी पद्धतीने पद भरले आहेत . परंतु अद्याप 1 लाख पदांवर कंत्राटी किंवा रोजंदारी तत्वावर देखिल भरती करण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे . परिणामी प्रशासकीय कामकाज मंद गतीने चालते . यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी रिक्त पदांवर जम्बो भरती करण्याचे ठरविले आहे . सदर भरती प्रत्यक्ष ऑक्टोबर महिन्यात चालु होणर आहे . तर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सदर भरतीचा निकाल जाहीर करुन निवड झालेल्या उमेदवारांना निवड आदेश देण्यात येणार आहेत . यामध्ये ज्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत , अशा विभागांमध्ये प्रथम प्राधान्याने पदे भरली जाणार आहे .

गृह खात्यामधील पोलिस शिपाई पदांकरीता 7231 पदे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 11,026 पदे भरली जाणार आहेत , तर शालेय शिक्षण विभागामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 32,208 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे .तर जिल्हा परिषद व इतर विभागामधील वर्ग – क व वर्ग – ड पदांच्या 60,000 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासकीय नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .

1 thought on “महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये विविध पदांच्या 78000 जागांसाठी मेगाभरती जाहीर ! विभागानिहाय रिक्त पद पाहा .”

Leave a Comment