राज्य शासनाच्या दि.15.11.2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदे अंतर्गत येणाऱ्या वर्ग – संवर्गातील पदे भरती प्रक्रिया बाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला असून , सदर वेळापत्राकानुसार भरती प्रक्रिया होवून नियुक्त्या 01 मे ते 31 मे या कालावधीमध्ये देणे नमुद आहे .परंतु सदरचा निर्णय रद्द करुन जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रिक्त पदांवर तात्काळ पदभरती राबविण्याबाबत विभागीय आयुक्तांना आदेश देण्यात आलेले आहेत .
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 75 हजार सरळ सेवा भरती कोट्यातील जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागेच्या 80 टक्के वर्ग क संवर्गातील पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहेत . सदर पदभरती टीसीएस व आयबीपीएस ( IBPS ) कंपन्यामार्फत घेण्यात येणार असल्याने , भरती प्रक्रियेस अधिक वेळ लागणार आहे . यामुळे पदभरती प्रक्रियेची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत .जेणेकरुन भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे .
राज्याचे अप्पर मुख्य सचिव श्री.राजेश कुमार यांनी विभागीय आयुक्त पुणे विभाग श्री.सौरभ राव यांच्या नावे ग्रामविकास विभागाचे पत्र पाठवून , जिल्हा परिषदे अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाच्या बिंदु नामावली विभागीय कक्षाकडुन तपासून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत .जेणेकरुन जिल्हा परिषदेच्या पदभरती प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत .
या निर्णयामुळे राज्यांमध्ये लवकरच तात्काळ जिल्हा परिषदे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची बातमी समोर येत आहे .यामुळे उमेदवारांनी गाफील न राहता तयारीला लागावे , तसेच आवश्यक कागतपत्रे काढुन घ्यावेत .
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .