MAHAVITARAN : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 5,347 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये तब्बल 5,347 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यामध्ये विद्युत सहाय्यक पदांच्या एकुण 5,347 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Vidyut Sahayak Post , Number of Post Vacancy – 5,347 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaiton ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच वीजतंत्री / तारतंत्री ( Electrician / Wireman ) ट्रेड मध्ये आयटीआय पदविका अभ्यासक्रम प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नागरी सहकारी पतसंस्था मध्ये सरळसेवा पद्धतीने विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 29.12.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर यांमध्ये मागास प्रवर्ग / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/  या संकेतस्थळावर दिनांक 20 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 250/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 125/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment