राज्य शासनांच्या बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी चालविण्यात येतात , या अंगणवाडी मध्ये राज्य शासनांच्या निर्देशा नुसार राज्यांमध्ये तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या पदभरती प्रक्रियेस अखेर सुरुवात झाली आहे . अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या जिल्हा प्रशासनांकडून तालुक्यानिहाय पदभरती प्रक्रिया निर्गमित करण्यात येत आहेत .
अंगणवाडी मदतनिस या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदे हे केवळ महिला उमेदवारांकरीता राखीव ठेवण्यात आलेले आहेत . तसेच सदर पदांकरीता महिला उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . तसेच अंगणवाडी मदतनिस या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
त्याचबरोबर सदर पदांकरीता स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे . तसेच सदर पदांवर निवड झालेल्या महिला उमेदवारांस प्रतिमहा 5,500 ते 12,500/- रुपये मानधन देण्यात येते .
सविस्तर मेगाभर्ती जाहीरात पाहा
तर अंगणवाडी सेविका या पदांकरीता महिला उमेदवार स्थानिक रहिवासी असून , इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तसेच सदर उमेदवाराचे वय हे 18 वर्षे ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे तसेच सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 5,500 ते 12,500/- रुपये वेतनमान देण्यात येते .
जिल्हानिहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026