महिला किसान योजनेअंतर्गत शासन देणार महिलांना 50 हजार रुपये निधी, जाणून घ्या पात्रता / अर्ज प्रक्रिया !

Spread the love

पंतप्रधान किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान सन्मान निधी या योजमेच्या संदर्भातील माहिती तुम्हाला असेलच. पण महिला किसान योजना संदर्भाबद्दल तुम्हाला जर माहिती नसेल, तर आज आपण महिला किसन निधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. यासोबतच या योजनेचा लाभ कशाप्रकारे आपण घेऊ शकतो. याबद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. महिला किसान या शासकीय योजनेअंतर्गत अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला आहेत. अनुसूचित जातीमधील सुद्धा ज्या काही उपजाती आहेत जसे की ढोर, होलार मोची, चर्मकार इत्यादी प्रवर्गातील महिलांना यशसकीय योजनेचा लाभ दिला जाईल.

महिला किसान योजनेच्या अंतर्गत वरील समाजाच्या महिलांचे जीवनमान उंचावणे, यासोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळवणे, हाच शासनाचा महिला किसान योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. फक्त अनुसूचित जाती मधील चर्मकार व वरील सांगितल्याप्रमाणे त्याच समाजातील महिला या योजनेसाठी पात्र ठरतील.

महिला किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी खालील प्रमाणे असतील

• जी व्यक्ती या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणार आहे, ती चर्मकार समाजातीलच असणे बंधनकारक राहील.

• महाराष्ट्रातील रहिवासी व्यक्तीच या योजनेसाठी अर्ज करू शकेल.

• अर्ज करणारे व्यक्तीचे वय 18 ते 50 वर्ष असावे.

• अर्जदार ती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन जो व्यवसाय उभा करणार आहे त्या व्यवसायाचे त्या व्यक्तीस पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

• ग्रामीण भागातील महिलांचे उत्पन्न श्री वार्षिक 98 हजार तर शहरी भागातील महिलांचे उत्पन्न हे वार्षिक एक लाख वीस हजार च्या आत असणे बंधनकारक राहील.

• तहसीलदारांनी दिलेल्या जातीच्या दाखला सोबत असावा.

• आणि अर्जदार व्यक्तीने या शासकीय योजनेचा लाभ आधी घेतलेला नसावा.

• या योजनेच्या अटी वरील प्रमाणे आहेत या अटीचे तुम्ही पालन केले आणि अर्ज केला आणि तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला नक्कीच या योजनेचा लाभ मिळेल.

महिला किसान योजनेचे स्वरूप

  • 50 हजार अधिक सहाय्यता महिला किसान योजनेअंतर्गत महिलांना दिली जाते, यामध्ये दहा हजार रुपयांचे अनुदान तर चाळीस हजार रुपयांवरती पाच टक्के व्याजदर दिला जातो.
  • प्रशासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावावर शेती असणे बंधनकारक आहे शेती पतीच्या नावावर ती असेल किंवा दोघांच्या सुद्धा नावावरती असेल तर अशावेळी सुद्धा या योजनेचा लाभ महिलांना मिळू शकेल.
  • पतीच्या नावावर ती शेत जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्या पतीचे प्रतिज्ञापत्र महिलांनी घ्यावे.
  • फक्त शेती व्यवसायासाठीच महिला किसान योजनेअंतर्गत कर्ज दिले जाईल.

शेती व्यवसाय करण्यासाठी सर्वांनाच पैशाची गरज पडते अशावेळी शासनाने महिला किसान योजनेचा लाभ घेतल्यास अशा महिलांना शेती करण्यास अशी ती पूरक व्यवसाय करण्यास हार्दिक साहित्य मिळू शकते यातून चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती साधता येते.

या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे कराल अर्ज?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा? तर महिला किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज संबंधित जिल्ह्याच्या सामाजिक न्याय यासोबतच विशेष सहाय्य विभागाच्या कार्यालयामध्ये निशुल्क अर्ज मिळतो. त्या ठिकाणी अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थितपणे भरून, जी काही कागदपत्रे लागतील ते जोडून जिल्ह्याच्या कार्यालयात सादर करावेत आणि यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पात्र म्हणून घोषित केले जाईल अशावेळी तुम्हाला या शासकीय योजनेचा लाभ मिळेल.

Leave a Comment