MAT : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये नोकरीची मोठी संधी ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Administrative Tribunal Recruitment for Chief Presenting Officer and Presenting Officer ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नावे – मुख्य सादर अधिकारी , सादर अधिकारी

पात्रता – वरील दोन्ही पदांकरीता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नावनोंदणी असणे आवश्यक आहे .अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे कमाल वयोमर्यादा 58 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने जाहीरातीमध्ये नमुद मुंबई , औरंगाबाद व नागपूर खंडपीठानिहाय पत्त्यावर दि.17 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क म्हणून कोणतीही रक्कम अदा करण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

शासन निर्णय

Leave a Comment