Megabharati : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांमध्ये विविध पदांच्या तब्बल 16,838 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

Megabharati 2023 : पिंपरी चिंचवड महानगर पालिका (PCMC Corporation ) ही भारत देशा मधीलच नाही तर , आशिया खंडामध्ये सर्वात मोठी ( आर्थिक दृष्ट्या ) आहे . सदर पालिका प्रशासनांमध्ये संवर्ग अ , ब व गट क आणि ड मध्ये तब्बल 16,838 पदांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात सुधारित आकृतीबंध पालिका प्रशासनांकडून तयार करण्यात आलेला आहे . संवर्गनिहाय रिक्त असणारी पदे पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पालिका प्रशासनांच्या सुधारित आकृतीबंधानुसार एकुण 16,838 पदांस मंजुरी देण्यात आलेली असून सदर यापैकी या अगोदर 7,053 पदे भरण्यात आलेली आहेत . तर आता सर्व संवर्गातील तब्बल 9 हजार 785 पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

यापैकी संवर्ग क मध्ये सर्वात जास्त पदे नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत , गट क संवर्गामध्ये एकुण 8 हजार 41 पदांस मंजुरी देण्यात आलेली असून यापैकी 3,321 पदे भरलेली असून उर्वरित 4,720 पदे रिक्त आहेत .तसेच गट क संवर्गात एकुण 7,765 पदांस मंजुरी देण्यात आलेली असून सदर पदांपैकी एकुण 3,352 पदे भरलेली आहेत तर उर्वरित 4,413 पदे रिक्त आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

तर गट अ संवर्गांमध्ये 475 पदांस मंजुरी देण्यात आलेली असून यापैकी 162 पदे भरलेली आहेत तर 313 पदे रिक्त आहेत .तसेच संवर्ग ब मध्ये 557 पदे मंजुर असून यापैकी एकुण 218 पदे भरलेली आहेत तर उर्वरित 339 पदे रिक्त आहेत . गट अ मधील सर्व पदे तर, गट ब संवर्गातील काही पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत .

Leave a Comment