महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये गट ब संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन ( Online Application ) मागविण्यात येत आहेत .पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता इ.पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B Post , Number of Post Vacancy -82 )
आयुष संचालक – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांमध्ये आयुष संचालनायातील आयुष संचालक , गट अ या पदांसाठी एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A ,B किंवा C मध्ये नमुद केलेली आवश्यक शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांस किमान 10 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 19 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
सहाय्यक आयुक्त – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमध्ये सहाय्यक आयुक्त पदांच्या एकुण 41 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा B.A /B.SC /B.COM /LAW , सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा अथवा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 23 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
समाजकल्याण अधिकारी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमध्ये समाजकल्याण अधिकारी पदांच्या एकुण 22 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हा समाज कल्याण विज्ञान अथवा सामाजिक कार्य पदवी धारक असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 20 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये आत्ताची मोठी मेगाभर्ती 2023
गृह प्रमुख – समाज कल्याण आयुक्तालय , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमध्ये एकुण 18 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमदेवार हा हा B.A /B.SC /B.COM /LAW , शिक्षण पदवी व 05 वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.01 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय 20 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
आवेदन शुल्क – यांमध्ये आयुष संचालक व गृह प्रमुख या पदांकरीता 719 /- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , तर मागास वर्गीय / अनाथ / आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील उमदेवारांसाठी 449/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .तर सहाय्यक आयुक्त व समाजकल्याण अधिकारी या पदांसाठी 394/- रुपये तर मागासवर्गीय / अनाथ / आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 294/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.15 मे 2023 पासुन दि.05 जून 2023 पर्यंत आवेदन सादर करुन शकता .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी :- जाहिरात पाहा
पर क्र. 02 साठी :- जाहिरात पाहा
पद क्र. 03 साठी :- जाहिरात पाहा
पद क्र. 04 साठी :- जाहिरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026