महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक , वाहक व लिपिक पदांच्या एकुण 17,230 जागेसाठी मेगाभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये चालक – वाहक त्याचबरोबर लिपिक पदांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त झालेले आहेत . यामुळे महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे . अनेक कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागत आहे .सध्या बस महामंडळ मध्ये 25,000 पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर महाभरती होणार आहे , याबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार , स्वात्रंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाकडुन 75,000 जागेवर महाभरती आयोजित करण्यात येणार आहे . यामध्ये सध्या 18,000 पोलिस शिपाई पदांकरीता पदभरती राबविली जात आहे . स्वात्रंत्र्य दिनाच्या महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने 75,000 जागेमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मधील रिक्त पदांपैकी एकुण 17,230 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .यामध्ये प्रामुख्याने चालक , वाहक त्याचबरोबर लिपिक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

सध्या चालक व वाहक पदांच्या 15,000 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत , त्याचबरोबर वाहन निरिक्षक , लिपिक , हमाल , डेपो निरीक्षक पदांच्या भरपुर जागा रिक्त आहेत .चालक – वाहक तसेच लिपिक वर्गीय वर्ग – क संवर्गातील पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .या पदभरती मुळे राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी प्राप्त होणार आहे .सदर पदभरती प्रक्रिया पुढील महीन्यामध्ये आयोजित करण्यात होण्याची शक्यता आहे .

Leave a Comment