मुंबई महानगपालिका प्रशासनांमध्ये रिक्त पदांच्या 2,310 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

मुंबई पालिका प्रशासनांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांच्या तब्बल दोन हजार 310 पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . महानगरपालिका प्रशासनांकडून चतुर्थश्रेणी कर्मचारी पदांच्या रिक्त जागांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यांमध्ये मंजुर पदांच्या तुलनेतर रिक्त पदांची आकडेवारी जास्त असल्याने प्रशासन कामकाजांमध्ये मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत .

अ.क्रपदनामरिक्त पदांची आकडेवारी
01.शिपाई1797
02.हमाल391
03.माळी /रखवालदार122
 एकुण पदसंख्या2,310

वरील तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका प्रशासनांमध्ये शिपाई पदांच्या एकुण 2,635 जागा रिक्त आहेत यापैकी रिक्त पदांची आकडेवारी 1797 आहे . तर हमाल पदांची मंजुर संख्या ही 602 आहे तर यापैकी रिक्त पदांची आकडेवारी 391 आहे . तसेच माळी / रखवालदार पदांच्या एकुण मंजुर संख्या 231 आहेत , यापैकी रिक्त पदांची आकडेवारी 122 आहे .

हे पण वाचा : पुणे शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

सदर चतुर्थश्रेणी रिक्त पदांवर कायमस्वरुपी / कंत्राटी पद्धतीने लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . देशांमध्ये कंत्राटीकरण / खाजगीकरणांस मोठा विरोध होत असल्याने , सदरची पदे ही नियमित स्वरुपात भरण्यात येतील .

Leave a Comment