नागपुर महानगरपालिका मध्ये 17,981 पदांसाठी पदभरतीस अखेर मंजुरी , सुधारित जाहीरात पाहा !

Spread the love

नागपुर महानगरपालिकेच्या 17,981 पदांच्या एकत्रित आकृतीबंधास मान्यता देणेबाबत नगरविकास विभागांकडून दि.10 मे 2023 रोजी पदभरती प्रक्रिया शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर सुधारित आकृतीबंधानुसार तब्बल 7,503 नविन पदे निर्माण करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहेत .

सदर नमूद करण्यात आलेली 7,503 नविन पदे निर्माण करताना एक वेळची विशेष बाब म्हणून नागपुर महानगरपालिकेच्या 35 टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .इतर महानगरपालिकांच्या आकृतीबंधाशी सुसंगती व पदानुक्रमाच्या सोयीच्या द्ष्टीकोनातून नागपूर महानगरपालिकेच्या काही पदांच्या अन्य संवर्गातील समायोजनाबाबतचा तपशिल सदर शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र क मध्ये दर्शविण्यात आला आहे , तसेच काही पदांची नावे , वेतनश्रेणी व ग्रेड पे मधील बदल याबाबतचा तपशिल सदर शासन निर्णयामध्ये दर्शविण्यात आला आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

सदर सुधारित आकृतीबंधानुसार तब्बल 17, 981 पदांस मान्यता देण्यात आलेली असून जुन्या आकृतीबंधातील 2705 पदे व्यपगत करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात येत आहे .सदर आकृतीबंधात मंजुर नवनिर्मित 7503 पदांमध्ये सफाई मजदूर या संवर्गाची 4721 पदे समाविष्ट आहेत , या पदांमध्ये यापुर्वी शासन निर्णय दि.20 सप्टेंबर 2019 नुसार मंजुर करण्यात आलेली 4407 इतक्या अधिसंख्य पदांचा समावेश आहे .

या 4407 अधिसंख्य पदांचा आयुक्त नागपुर महानगरपालिका यांनी वेळोवेळी आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .सध्य स्थितीमध्ये स्थायी पदांची मंजूर पदांची संख्या 13,183 असून नगर विकास विभागाच्या सफाई कर्मचारी अधिसंख्या पदांची संख्या 4407 पदे मंजुर असे एकुण 17,981 पदे मंजुर आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment