नागपुर पालिका प्रशासनांमध्ये गट अ , ब , क व ड  संवर्गातील तब्बल 17,981 पदांसाठी महाभरती 2023

Spread the love

नागपुर पालिका : नागपूर पालिका प्रशासनांमध्ये सुधारित आकृतीबंधानुसार गट अ , ब व क संवर्गामध्ये तब्बल 17 हजार 981 पदांसाठी महाभरती प्रक्रियास राज्य शासनांच्या नगर विकास विभागांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . नागपूर पालिका ही गट अ दर्जाची पालिका असल्याने पालिकेचे कार्यक्षेत्र 227 चौ.कि.मी असून शहराची लोकसंख्या अंदाजे 30 लाख इतकी आहे .

नागपूर महानगरपालिका मोठ्या प्रमाणात वाढलेले नागरीकीकरण , सदर क्षेत्रात असलेले महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडाद्वारे उद्योगांचे जाळे , केंद्र व राज्य शासनाचे महत्वाचे उपक्रम / संस्था / प्रकल्प / योजना यामुळे पायाभुत सुविधांवर पडणाारा ताण तसेच लोककल्याणकारी व गतिमान प्रशासन म्हणून नागरी स्थानिक संस्थेची भुमिका पार पाडण्याकरीता नागपूर महानगरपालिकेतील प्रशासकीय व तांत्रिक कामकाजांसाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार पदनिर्मिती करण्यात आली आहे .

सदर सुधारित आकृतीबंध शासन निर्णयानुसार नव्याने 7,503 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत यांमध्ये सफाई मजदुर या संवर्गातील 4721 पदांचा समाविष्ट आहेत .एकुण 20,686 पदांमधून तब्बल 2705 पदे वगळून नागरपूर पालिका प्रशासनांत सुधारित आकृतीबंधानुसार 17 हजार 981 पदांस मंजुरी देण्यात येत आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

यांमध्ये आयुक्त , अतिरिक्त आयुक्त , विधी अधिकारी , सुरक्षा अधिकारी , स्टेनोग्राफर , अधिक्षक , अभियंता , वाहन चालक , लिपिक , चपराशी , शिपाई , कर निरीक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , वायरमन , कर संग्राहक , कारपेंटर , टर्नर , वैद्यकीय अधिरी , नर्स , एक्स – रे तंत्रज्ञ , सहाय्यक ग्रंथालय , प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , शिक्षक , विशेष शिक्षक ,पोलिस कॉन्‍स्टेबल इत्यादी पदांवर सुधारित आकृतीबंधानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी सुधारित नगर विकास विभागाचा पदभरती शासन निर्णय पाहा

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment