भारत सरकारच्या मुद्राणालय नाशिक येथे फक्त 8 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया ! लगेच अर्ज करा !

Spread the love

भारत सरकारच्या मुद्राणलय नाशिक येथे विविध पदांच्या 17 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . सविस्तर पदभरती जाहीरात आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

1)बुक बाइंडर –  बुक बाइंडर पदांच्या एकुण 08 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता  उमेदवार हा इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे वय 14 ते 19 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 6,000/- रुपये ते 11,382 /- रुपये वेतन दिले जाईल .

हे पण पाहा : RBI मध्ये 10 पात्रता धारकांसाठी मोठी भरती !

2) ऑफसेट मशिन माईंडर – ऑफसेट मशिन माईंडर पदाच्य एकुण 09 पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय 14 ते 19 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 6,000/- रुपये ते 11,382/- रुपये प्रतिमहा वेतन देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दि.14 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन फिस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment