PCMC : पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये तब्बल 16,838 पदांसाठी महाभरती जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पदांचा सुधारित आकृतीबंध लागु करण्यात आलेला आहे . या सुधारित आकृतीबंधानुसार पालिका प्रशासनांमध्ये तब्बल 16,838 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या अगोदर जुन्या पदांच्या आकृतीबंध बिंदुनामावलीनुसार 11,513 पदे मंजुर होते यामध्ये आता बदल करुन एकुण 16,838 पदे मंजुर करण्यात आलेली आहेत .

यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय विभागातील परिचारिका , कनिष्ठ अभियंता , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , उद्यान निरीक्षक , विधी अधिकारी , कोर्ट लिपिक, उद्यान अधिक्षक , भांडारपाल , सुपवायझर , कनिष्ठ लिपिक , पशुसेवक , समाजसेवक , अतिरिक्त कायदा सल्लागार , शिक्षक ,प्रयोगशाळा सहाय्यक , अधिकारी वर्ग ब व अ , अग्निशमन अधिकारी / जवान इत्यादी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

मे महिन्यांमध्ये सुरु होणार प्रत्यक्ष भरती प्रक्रिया – मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासूनच वरील नमुद पदांकरीता पदभरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहीती पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे .पालिकेतील रिक्त पदांवर 80 टक्के क्षमतेने पदभरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .

पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी आयबीपीएस / टीसीएस कंपनीमार्फत पदभरती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनांकडून घेण्यात आलेला आहे . सदर पदभरती प्रक्रिया बाबत अधिक माहितीसाठी www.pcmcindia.gov.in/index.php या संकेतस्थळाला भेट देवून सविस्तर माहिती मिळवू शकता .

Leave a Comment