सर्वात मोठी मेगाभरती : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तब्बल 16,838 पदांसाठी महाभरती ! लगेच करा अर्ज !

Spread the love

पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होणार विस्तार तसेच महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेली वाढ लक्षात घेता , पालिका प्रशासनांमधील पदांच्या आकृतीबंधामध्ये बदल करण्यात आला आहे . सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आले असून या सुधारित आकृतीबंधानुसार एकुण 16,838 पदे मंजुर करण्यात आली आहेत . या अगादर पालिका प्रशासनांमध्ये 11,513 पदे मंजुर होती .

आता नविन सुधारित आकृतीबंधानुसार नव्याने 5,325 पदांची निर्मिली पालिका प्रशासनांकडून करण्यात आलेली आहे .यामुळे आता सध्या नविन व जुना आकृतीबंधानुसार एकुण 16,838 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे .सदर सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त व वाढीव पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यासाठी मंजुरीकरीता शासनास पाठविण्यात आलेले आहेत .मंजुरीनंतर पालिका प्रशासनांमध्ये सर्वात मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

पिंपरी चिंचवड पालिकेचा समावेश आता ब गटात करण्यात आलेला असून पालिकेच्या वाढत्या लोकसंख्या व कामाचा वाढता बोजा लक्षात घेवून , पालिका प्रशासनाने अधिक संख्येने अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सुधारित आकृतीबंध तयार करुन वाढविण्यात आलेली आहे .

सध्या जुन्या आकृतीबंधानुसार 11,513 मंजुर पदांपैकी केवळ 7,053 पदे भरलेली आहेत , उर्वरीत 4,460 पदे रिक्तच होते , आता सुधारित आकृतीबंधानुसार 4,460+5325 असे मिळून 9,785 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये कायम नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .

सविस्तर जाहिरात पाहा

Leave a Comment