महाराष्ट्र शासन सेवेमध्ये तलाठी पदांच्या तब्बल 4,122 तलाठी व 512 मंडळ अधिकारी पदांच्या पदभरती प्रक्रिया बाबत राज्य शासनाकडून नविन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून , नियोजित वेळापत्रकानुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे .
तलाठी पदभरती प्रक्रिया बऱ्याच दिवसांपासून रखडत असल्याने , पुढील महिन्यांच्या दुसऱ्या आठवड्यांमध्ये तलाठी पदांच्या रिक्त जागांपैकी 100 टक्के क्षमतेवर पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार असून , अर्ज सादर करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात येईल . अर्ज सादर केल्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये IBPS / TCS कंपनीमार्फत शिफ्ट परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे .
ऑनलाईन परीक्षेचे आयोजन मे महिन्यांच्या पहिल्या आठवड्यांपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .परीक्षेनंतर लगेच 15 दिवसानंतर परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध केला जाईल . व जुन महिन्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्यक्ष आदेश देण्यात येतील .
यामध्ये विशेष म्हणजे उमेदवारांना केवळ एकदाच अर्ज सादर करता येणार नाही , कोणत्याही परिस्थितीमध्ये डमी अर्ज सादर केल्याचे आढळून आल्यास सदर उमेदवार पदभरती प्रक्रियामधूनच बाद ठरविण्यात येणार आहे .
यामुळे राज्यातील बेराजगार तरुणांनी तलाठी पदभरती प्रक्रियेबाबत आवश्यक कागतपत्रांची जमावजमव करणे आवश्यक आहे . व नव्याने तयारीस सुरुवात करणे आवश्यक आहे . यामुळे राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांना राज्य शासनाच्या सेवेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .