महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील महसूल व वन विभागांमध्ये तलाठी पदांच्या तब्बल 4,122 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राज्य शासनांकडून मंजुर करण्यात आलेली आहे .राज्य शासनाच्या नियोजित वेळापत्रकानुसार तलाठी भरती ही मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार होती . परंतु काही कारणास्तव तलाठी पदभरती पुढे ढकलण्यात आली असून , तलाठी पदभरचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे .
तलाठी पदभरती प्रक्रियेमध्ये सुधारित बदल –
राज्य शासन सेवेमध्ये कोरोना महामारीमुळे तब्बल 3 वर्षांपासून कोणत्याही प्रकारची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती . यामुळे राज्य शासनाने सरळसेवा पदभरती प्रक्रियामध्ये मोठा बदल करुन कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दि.03.03.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
तलाठी पदभरती नवीन वेळापत्रक पाहा
या निर्णयामुळे पदभरती प्रक्रियेकरीता उमेदवारांना दोन वर्षांची कमाल वयोमर्यार्देची शिथिलता देण्यात आलेली आहे .सरळसेवा पदभरती प्रक्रियेकरीता खुल्या प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा 40 वर्षे तर मागास प्रवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत पर्यंत वयांमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे .
त्याचबरोबर पदभरती प्रक्रिया मध्ये दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे पदभरती प्रक्रिया ही आयबीपीएक / टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे , ज्यामुळे पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्याची शक्यता आहे .या अगोदर पदभरती प्रक्रिया ह्या जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येत होत्या ज्यामध्ये अनेक तक्रारी राज्य शासनाला येत होत्या यामुळे राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे .
तलाठी पदभरतीचे नविन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले असून , सविस्तर नविन वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
तलाठी भरती नवीन वेळापत्रक पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..