राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना लवकरच लागू होणार जुनी पेन्शन ! वाचा सविस्तर बातमी !

Spread the love

राज्य शासन सेवेतील नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल . केंद्र सरकारने देखील जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेत काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे .

राज्य शासन सेवेतील नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेमध्ये रुजू झालेले , परंतु ज्या पदांची जाहिरात 2005 पूर्वीच निर्गमित झाली होती . अशा कर्मचाऱ्यांना यापूर्वीच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे . केंद्र सरकारने देखील 2004 पूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिराती परंतु 2004 नंतर सदर कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली असल्यास अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्यात आलेला आहे .

सध्या राज्य शासकीय कर्मचारी दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत . यामुळे राज्य सरकारची मोठी कोंडी होणार आहे . म्हणून राज्य सरकारला जुनी पेन्शन बाबत योग्य ते निर्णय घ्यावाच लागणार आहे.

Leave a Comment