DA : राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार 42% दराने DA !

Spread the love

राज्यातील शासकीय , निमशासकीय त्याचबरोबर इतर पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वाढीव 4% महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या याच धर्तीवर राज्यातील शासकीय, निमशासकीय त्याचबरोबर राज्य पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2023 पासून आणखीन चार टक्के डीए वाढीचा लाभ मिळणार आहे .

सदरचा 4% महागाई भत्ता वाढ माहे जानेवारी 2023 पासून लागू करण्यात येणारा असल्याने, कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता फरकाचा लाभ अदा करण्यात येणार आहे . वाढीव चार टक्के महागाई भत्ता चा अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित केला जाणार असल्याची बातमी समोर येत आहे .

सध्या राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 38 टक्के दराने डीए लाभ मिळत आहे . जानेवारी 2023 पासून आणखीन चार टक्के महागाई भत्ता वाढल्यास राज्य कर्मचाऱ्यांना एकूण 42 टक्के दराने डी ए लाभ मिळणार आहे .

Leave a Comment