Pashusavardhan : महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये विविध पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे . पदांचे नाव, पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, पदांची संख्या यासंदर्भातील सविस्तर पद भरती प्रक्रिया जाहिरात पुढील प्रमाणे पाहूयात..
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 21. 11. 2022 नुसार दिलेल्या मान्यता नुसार पशुसंवर्धन विभागातील राज्यस्तरीय गट- क सरळसेवा संवर्गातील विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे .
पदांचे नाव / पदसंख्या : यामध्ये पशुधन पर्यवेक्षक पदांच्या 376 जागा , वरिष्ठ लिपिक पदांच्या 44 जागा , लघुलेखक उच्च श्रेणी पदांच्या 02 जागा ,लघुलेखक निम्न श्रेणी पदांच्या 13 जागा , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 04 जागा , त्याचबरोबर विविध संवर्गातील इतर 07 पदे ( यामध्ये तारतंत्री पदांच्या 03 जागा यांत्रिकी पदांच्या 03 जागा , बाष्पक परिचर पदांच्या 02 जागा ) अशा एकूण 446 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक 11 जून 2023 पर्यंत https://ahd.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करायचा आहे .सदर पद भरती प्रक्रिया करिता 1000/- रुपये आवेदन शुल्क तर मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग त्याचबरोबर माजी सैनिक उमेदवारांकरिता 900/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .