पुणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये अधिकारी , लिपिक व शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांनुसार आवश्यक पात्रता , आवेदन शुल्क ,वयोमर्यादा याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहुयात .
१) पदनाम – प्रोबेशनरी अधिकारी
पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . जे.ए.आ.आय.बी / सी.ए .आय.बी. / जी .डी.सी.ए / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकेची बँकिंग /सहकार / कायदेविषयक पदविका व इतर वित्ती संस्थेमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
वयोमर्यादा – सदर पदाकरीता उमेदवार हा वयाच्या 45 वर्षांपर्यत अर्ज सादर करण्यास पात्र असेल .
२) पदनाम – लिपिक
पात्रता – उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमदेवार हा MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . .ए.आ.आय.बी / सी.ए .आय.बी. / जी .डी.सी.ए / तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेची बँकेची बँकिंग /सहकार / कायदेविषयक पदविका व इतर वित्ती संस्थेमध्ये किमान 3 वर्षांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
वयोमर्यादा – सदर पदाकरीता उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 35 वर्षापेक्षा अधिक असू नये .
३) पदनाम – शिपाई
पात्रता – शिपाई पदाकरीता उमेदवार हा इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच उमेदवारास मराठी / हिंदी /इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे .शिपाई पदाकरीता अर्ज सादर करण्साठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक असू नये .
परीक्षा शुल्क – लेखी परीक्षा शुल्क म्हणून तिन्ही पदांकरीता 700/- +18% GST असे मिळून एकुण 826/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया – खालील जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.punebankasso.com/default.aspx या संकेतस्थळावर दि.29 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !