तलाठी भरती प्रक्रिया संदर्भात आताची सर्वात मोठी भरती अपडेट समोर आलेली आहे . राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार तलाठी पदांच्या 3,110 तर मंडळ अधिकारी पदांच्या 518 पदे मिळून , एकूण 3628 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवणे बाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.
तलाठी पदांच्या काही पदे वाढीव निर्माण करण्यात आलेले असल्याने , तलाठी पदाच्या एकूण 4,122 जागेसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . नुकतेच महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना , व सांगितले की , तलाठी पदाकरिता आवश्यक बाबी पूर्ण करण्यात आलेली असून , पदभरती जाहिरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल .
तलाठी पदांच्या मंजूर पदांपैकी 3,110 जागा रिक्त आहेत ,तर 1,102 जागा नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत . असे एकूण मिळून 4,122 जागेवर पद भरती प्रक्रिया राबवण्याकरिता राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे . तर मंडळ अधिकारी पदांच्या 512 जागेसाठी भरती प्रक्रिया करिता मंजुरी देण्यात आलेली आहे .
तलाठी पदाकरिता आवश्यक पात्रता – तलाठी पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवीधारक असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा MSCIT / CCC परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !