पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pune Zilha Nagari Sahakari Bank Association Recruitment for Clerk Post , Number of Post vacancy – 50 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – लिपिक ( प्रशिक्षणार्थी ) , एकुण पदांची संख्या 50
पात्रता – सदर पदे ही केवळ महिला उमेदवारांसाठीच राखीव असुन , सदर पदांकरीता उमेदवार ही कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर इयत्ता दहावीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण तर पदवीमध्ये किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – दि.17 फेब्रुवारी 2023 रोजी उमेदवाराचे वय 22 ते 33 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे तर राखीव प्रवर्गातील महिला उमदेवारांना वयांमध्ये 2 वर्षे सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक महिला उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.punebankasso.com/ या संकेतस्थळावर दि.17 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर बँक भरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडुन 1180/- रुपये आवेदन शुल्क म्हणून स्विकारले जातील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026