पुणे येथे 10 वी पात्रता धारकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! 18,000-56900/- एवढा मिळेल पगार !

Spread the love

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे येथे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे ,सदर पदभरती प्रक्रिया ही केवळ दहावी उत्तीर्ण पात्रतेवर असल्याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली आहे . या संदर्भातील सविस्तर पदभरती तपशिल , पात्रता याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

केंद्रीय जीएसटी आणि सीमाशुल्क पुणे येथील कार्यालयांमध्ये कॅन्टीन अटेंडंट पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये पोस्टाद्वारे / प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये आवेदन सादर करायचे आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

पात्रता – कॅन्टीन अटेंडंट पदाकरीता उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातून माध्यमिक बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये पाच तर इतर मागस वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

वेतनमान – कॅन्टीन अटेंडंट पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार नियमित वेतनश्रेणींमध्ये वेतन 18000-56900/- + इतर वेतन व भत्ते लागु असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने The Joint Commissioner, Cadre Control Cell, Central GST & Customs, Pune Zone, GST Bhavan: 41-A, Sasson Road, OPP. Wadia College, Pune-411001. या पत्त्यावर दि.06.05.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment